Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीजिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सह कुरखेडाचे नायब तहसिलदार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सह कुरखेडाचे नायब तहसिलदार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रमासाठी विभाग स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आज,सोमवार २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाने लोकसहभागातून सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे सक्षमीकरण या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागातील ग्रामसभांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.हा पुरस्कार विभागीय स्तरांवरील निवड समितीमार्फत निवडलेल्या प्रस्तावांच्या श्रेणीत देण्यात आला असून,त्याचे स्वरूप  ४ लाख रुपये रोख असे आहे.
या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार निखील पाटील यांनाही त्यांच्या ‘एकच ॲप-सर्व सेवा’ या अभिनव उपक्रमासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.नागरिकांना तहसिल कार्यालयाच्या विविध सेवा एकाच मोबाइल ॲपच्या माध्यमातून सुलभपणे उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या गटातील ‘सर्वोत्तम कल्पना व उपक्रम’ श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून त्याचे स्वरूप ३० हजार रुपये रोख असे आहे.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात वर्ष २०२३-२४ आणि वर्ष २०२४-२५ चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रशासन लोकाभिमुख करणे,त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा राबविण्यात आल्या.या कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!