Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीजनतेच्या संयमाचा बांध फुटला; वीजपुरवठा व रानटी हत्तींच्या त्रासापायी येत्या २२ एप्रिल...

जनतेच्या संयमाचा बांध फुटला; वीजपुरवठा व रानटी हत्तींच्या त्रासापायी येत्या २२ एप्रिल रोजी चक्काजाम आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात विजेची समस्या व रानटी हत्तींनी उपद्रव माजविला आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात विजेचा लपंडाव सुरू असून रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस चालवली असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अशातच समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्यापही यावर ठोस उपाययोजना करण्यात शासन व संबंधित विभाग फोल ठरला आहे.त्यामुळे आता जनतेच्या संयमाचा बांध फुटला असून येत्या,मंगळवार २२ एप्रिल रोजी आरमोरी तालुक्याच्या देऊळगाव मुख्य मार्गावरील नॅशनल हायवेवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गडचिरोली येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.पार पडलेल्या पत्रपरिषदेत आंदोलनाचे नियोजन, मागण्या व पुढील धोरण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आमदार रामदास मसराम व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!