Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरशिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना फुटला घाम; पेंटिंग ठेकेदाराने केली होती तक्रार.. -...

शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना फुटला घाम; पेंटिंग ठेकेदाराने केली होती तक्रार.. – शिक्षण घोटाळ्यातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बनावट कागदपत्रांआधारे मुख्याध्यापकाला मंजुरी दिल्याचे शिक्षण विभागात प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.सदर पोलिस ठाण्यातच विविध प्रकारच्या पाच तक्रारी आल्या आहेत.विशेष म्हणजे,अटकेत असलेले पाचही अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असून,त्यात काही अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही आरोपींची काल बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी काल बुधवारी १६ एप्रिलला शिक्षण उपसंचालक उल्हास नरड,अधीक्षक नीलेश मेश्राम, मुख्याध्यापक पराग पुडके,उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय दुधाळकर व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना न्यायालयापुढे हजर केले होते.पोलिसांनी आणखी चौकशीसाठी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली.मात्र,न्यायालयाने त्याला नकार देत सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान,पोलिसांनी बुधवारपर्यंत पाचही आरोपींची कसून चौकशी केली.मेश्राम,पुडके,दुधाळकर यांच्या चौकशीतून काही अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत.आता त्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.पोलिसांनी सद्यःस्थितीत अधिकृतपणे ही नावे जाहीर केलेली नाहीत.शिक्षक पद भरती घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.न्यायाधीश एस.एच.उके यांनी काल बुधवारी राज्य सरकारला नोटीस जारी करून यावर आज गुरुवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.नरड यांच्याविरुद्ध सदर पोलिसांनी पेंटिंग ठेकेदार मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीवरून ११ एप्रिल रोजी एफआयआर दाखल केला आहे.त्यानंतर त्यांना १२ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.या गुन्ह्यात फसविण्यात आले,असा दावा त्यांनी अर्जात केला आहे.नरडतर्फे ॲड.अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.सदर पोलिसांनी मंगळवारी दुपारी धंतोलीतील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची झाडाझडती घेतली असता मुख्याध्यापक पुडकेने पाठविलेला प्रस्ताव पोलिसांच्या हाती लागला होता.
यासोबतच पोलिसांना काही विशिष्ट फायलीदेखील सापडल्या आहेत.त्या फायलींचा अभ्यास सुरू आहे. त्यातून या प्रकरणातील अनेक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, सदर पोलिस ठाण्यात माजी उपसंचालक वैशाली जामदार यांच्याविरोधात तक्रार आली होती.यासोबतच पोलिसांकडे अशाच प्रकारच्या गैरप्रकारांसंदर्भात एकूण पाच तक्रारी आल्या आहेत.यात कुही,वरूड येथील तक्रारींचादेखील समावेश आहे.सध्या स्थितीत पोलिसांचा भर हा पुडकेविरोधात दाखल गुन्ह्याच्या चौकशीवर आहे.इतर तक्रारींची लवकरच चौकशी सुरू होईल.त्यामुळे शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!