Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरउमरेड एमआयडीसीत स्फोट; पाच कामगारांचा मृत्यू..

उमरेड एमआयडीसीत स्फोट; पाच कामगारांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसाहत स्थित असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत काल,शुक्रवारी ११ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला. सायंकाळच्या शिफ्टमध्ये जवळपास अंदाजे १५० कामगार कामावर होते.स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला.दरम्यान,कंपनीतील कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले.यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.मात्र,यात ११ कामगार गंभीर जखमी झाले.यातील चौघांची प्रकृती चिंताजनक होती. अशातच आता स्फोटातील जखमी कामगारांपैकी पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो.मात्र,अचानकपणे झालेल्या स्फोटामुळे अनेकांची धांदल उडाली होती.मध्यरात्री १ वाजतानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.सायंकाळी कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर
रात्री उशिरा पर्यंत सर्वच जखमी कामगारांना नागपूर येथे हलविण्यात आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!