Tuesday, July 28, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे चार दिवसीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव.. - विविध स्पर्धा,भीम गीतांचा...

कोंढाळा येथे चार दिवसीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव.. – विविध स्पर्धा,भीम गीतांचा कार्यक्रम तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या,सोमवार १४ एप्रिल रोजी १३४ व्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत राहुल बुद्धविहार कोंढाळा येथे बौध्द समाज आम्रपाली बौध्द महिला मंडळ,प्रशिक क्रिडा तथा युवा मंच भिमस्फुर्ती नाट्य कला मंडळ तसेच समता सैनिक दल कोंढाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.काल, शुक्रवार ११ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करून सकाळी १० वाजेच्या सुमारास भीमज्योत कार्यक्रम तर रात्री ९ वाजेच्या सुमारास भीमस्फूर्ती गायन मंडळ यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.
आज,शनिवार १२ एप्रिलला सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रशिक क्रीडा मंडळ तथा युवा मंच कोंढाळा यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकरिता सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.तर आज सकाळी १० वाजे दरम्यान बुध्दवंदना व सकाळी ११ वाजता राहुल बुद्ध विहार ते गावातील मुख्य मार्गावरून समता सैनिक दल यांचे पथ संचालन पार पडले.त्यानंतर दुपारी २ ते ३ वाजे दौड स्पर्धा,रांगोळी स्पर्धा आयोजित करून रात्री ९ वाजता मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.उद्या रविवार १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बुध्द वंदना,दुपारी २ ते ४ वाजे सामान्य ज्ञान स्पर्धा,सायंकाळी ५ ते ८ वाजे समाज प्रबोधन कार्यक्रम व जयंती दिनी सोमवार १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बुध्द वंदना,सकाळी ११ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम,सायंकाळी ३ ते ७ वाजता धम्मज्योत मिरवणूक व भोजनदान व रात्री १० वाजेच्या सुमारास सारीपाठ संसाराचा या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.आम्रपाली बौध्द महिला मंडळ,प्रशिक क्रिडा तथा युवा मंच,भिमस्फुर्ती नाट्य कला मंडळ तसेच समता सैनिक दल कोंढाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बौद्ध उपासक,उपासिका यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!