Saturday, June 27, 2026
Homeनागपूरहत्या प्रकरणात निष्काळजीपणा; पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली..

हत्या प्रकरणात निष्काळजीपणा; पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बारावीत असतांना दोघांची मैत्री होती.मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तिने त्याच्याशी संपर्क तोडला. कारागृहाबाहेर आल्यानंतर तो तिला भेटायला गेला. मात्र,तिने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने तिच्या वडिलांचा चाकूने भोसकून दिवसाढवळ्या पोलीस चौकीसमोरच खून केल्याची घटना २६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ च्या दरम्यान नागपूर शहराच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी येथे घडली होती.नरेश वालदे वय ५५ वर्षे, इंदिरानगर,जाटतरोडी यांचा खून करण्यात आला होता.नीतेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम वय ३५ वर्षे,रामबाग व ईश्वर ऊर्फ जॅकी सोमकुवर अशी आरोपींची होती.आरोपी नीतेशने खून केल्यानंतर फोटो घेतला व तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता व ‘बेबी,मी बघ काय केले आहे’ असे त्याने कॅप्शन लिहिले व तुटलेल्या हृदयाचे इमोजी टाकले होते.नीतेशच्या फ्रेंडलिस्टमधील काही जणांनी त्याला लाइकदेखील केले होते.त्याच्या या कृतीमुळे पोलिसदेखील काहीकाळ अवाक् झाले होते.
नीतेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याने २०१९ साली एकाची हत्यादेखील केली होती.संबंधित तरुणीला नीतेश अनेक दिवसांपासून त्रास देत होता.अशातच आता
नरेश वालदे हत्या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या इमामवाडा पोलिस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.तर पाच कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविण्यात आली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आलेली नाही,असा सवाल उपस्थित होत आहे.
२५ मार्च २०२५ च्या रात्री त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वालदे यांना मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला केला होता.वालदे घरी नसल्याने त्यांची बाइक खराब केली आणि निघून गेला.नितेश विरुद्ध आधीच खुनाचा गुन्हा दाखल होता.नितेश आणि त्याचा साथीदार कुख्यात गुन्हेगार असूनही,इमामवाडा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. वालदे यांनी संपूर्ण रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढली होती.त्यांनी कर्मचाऱ्यांकडून मदत मागितली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली.मात्र,डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.यामुळे आरोपींचे मनोबल वाढले आणि त्यांनी पोलिस चौकीसमोरच वालदेंची हत्या केली.उपायुक्त रश्मिता राव यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक आडे त्या दिवशी नाइट ड्युटीवर होते व त्यांनीच अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनदेखील कारवाई न केल्याचा ठपका लावत आडे यांना निलंबित करण्यात आले आहे.तर पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील तीन कर्मचारी,बिट मार्शल्स व एका कर्मचाऱ्याची पगारवाढ थांबविण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!