Thursday, August 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचालत्या बसने अचानक घेतला पेट; आगीचे रौद्ररुप धारण..

चालत्या बसने अचानक घेतला पेट; आगीचे रौद्ररुप धारण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-चालत्या बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील ४० प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.पाहता-पाहता काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.बस वाहन चालकच्या समयसूचकतेने सुदैवाने जीवितहानी टळली.सदरची घटना आज,सोमवारी ७ एप्रिलला दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील वगरवाडी शिवारात घडली.कर्नाटक राज्यातून एक बस सुमारे ४० भाविकांना घेऊन औंढा नागनाथच्या दिशेने येत होती.सदर बसमध्ये भाविकांसह त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याचे साहित्यही होते.दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सदर बस वसमतकडून औंढा नागनाथकडे येत होती.यावेळी वगरवाडी शिवारात बसच्या पाठीमागील भागातून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे तातडीने बस थांबवून भाविकांना खाली उतरविले.यावेळी परिसरातील नागरीक त्यांच्या मदतीसाठी धावले.त्यांनी वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले व काही साहित्यही बाहेर काढले.सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!