Sunday, May 31, 2026
Homeनागपूरवडिलाने पोटगी थकवली; मुलाने उच्च न्यायालयात धाव घेताच दणका..!

वडिलाने पोटगी थकवली; मुलाने उच्च न्यायालयात धाव घेताच दणका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आई नोकरीवर,मात्र तुटपुंज्या पगारातून मुलाचे पालन-पोषण करण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मुलाने ७० हजार रुपये वेतन असलेल्या वडिलांकडे पोटगी मागितली.न्यायालयाने पोटगी मंजूर करूनही पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बापास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसल्यानंतर मुजोर बाप सुतासारखा सरळ झाला.त्याने मुलाची ३ लाख १२ हजार रुपयांची पोटगी थकवली होती.ही रक्कम तो आता २५ हजार रुपये मासिक हप्त्याप्रमाणे मुलाला देणार आहे. याशिवाय,न्यायालयाने मुलाच्या शिक्षणाचा खर्चदेखील अदा करण्याचे निर्देश बापाला दिले आहेत.
मुलाच्या आई-बापाने कौटुंबिक वादामुळे आपसी सहमतीने घटस्फोट घेतला आहे.बाप सहाय्यक शिक्षक असून,तो नरखेड येथील रहिवासी आहे.त्याला ७० हजार रुपये मासिक वेतन मिळते; परंतु त्याने मुलाच्या पालनपोषण व शिक्षणाची काहीच सोय केली नव्हती. आईला तुटपुंजा वेतनातून मुलाची देखभाल करणे कठीण जात होते.मुलाने पोटगीकरिता सुरुवातीला कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता.कुटुंब न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली होती.मुलाला हा निर्णय मंजूर नव्हता.त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोटगी वाढवून मागितली होती.उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून ऑक्टोंबर-२०१५ पासून संबंधित वाढीव पोटगी मंजूर केली होती.परिणामी,१३ ऑक्टोंबर २०२१ रोजी उच्च न्यायालयाने मुलाला ७ हजार ५०० रुपये मासिक पोटगी अदा करा,असा आदेश बापाला दिला होता.बापाने मुजोरी दाखवून त्या आदेशाचे पालनच केले नाही. त्यामुळे मुलाने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.त्या याचिकेवरील सुनावणीलाही बाप हजर राहत नव्हता.करिता,न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.या दणक्यानंतर बापाने न्यायालयात हजर होऊन मुलाला थकीत पोटगी देण्याची ग्वाही दिली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सूर्यवंशी व प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मुलाच्या वतीने ॲड.अमृता गुप्ता यांनी बाजू मांडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!