Monday, August 24, 2026
Homeनागपूरकर्मचारी भरतीवरील बंदी;अनुकंपा नियुक्त्यांना लागू होत नाही...- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

कर्मचारी भरतीवरील बंदी;अनुकंपा नियुक्त्यांना लागू होत नाही…- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला निर्णय..- कर्मचारी वडिलाचा सेवेदरम्यान झाला होता मृत्यू …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले आहे.तसेच या प्रकरणातील दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर देण्यात आलेली नोकरी कायदेशीर ठरविली आहे.न्यायमूर्तिद्वय रोहित देव व यानशिवराज खोब्रागडे यांनी हा निर्णय दिला आहे.

विकास कामडी असे मुलाचे नाव असून ते नगरधन, तालुका-रामटेक येथील रहिवासी आहेत.त्यांचे वडील सुखदास नगरधन मधील इंदिरा गांधी विद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते.१७ जुलै २०१२ रोजी त्यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे विकास यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता.शिक्षणाधिकाऱ्यांनी २० जानेवारी २०१५ रोजी त्यांची शिपाईपदी नियुक्ती करण्याला मान्यता दिली; परंतु,शिक्षण उपसंचालकांनी ८ ऑगस्ट २०१८ रोजीच्या वादग्रस्त आदेशाद्वारे ती मान्यता रद्द केली होती.२ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कर्मचारी भरतीवर बंदी आणल्या गेली होती.त्यामुळे ही नियुक्ती केली जाऊ शकत नाही; असे कारण वादग्रस्त आदेशात देण्यात आले होते.त्याविरुद्ध विकास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असता कर्मचारी भरतीवरील बंदीचा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना लागू होत नाही; असा निर्णय देण्यात आला.याशिवाय,विकास यांच्या थकीत वेतन व इतर आर्थिक लाभाच्या बिलांना नियमानुसार मंजुरी द्या; असेही निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.विकास यांच्यातर्फे ॲड.संतोष चांडे यांनी बाजू मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!