Friday, August 28, 2026
Homeनागपूरनागपूर विभागीय पारंपारिक क्रीडा कुंभ स्पर्धा संपन्न.. - स्पर्धेत देसाईगंज,गडचिरोली शासकीय औद्योगिक...

नागपूर विभागीय पारंपारिक क्रीडा कुंभ स्पर्धा संपन्न.. – स्पर्धेत देसाईगंज,गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे यश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नुकतेच नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नागपूर विभागीय पारंपारिक क्रीडा कुंभ स्पर्धा पार पडल्या.सदर क्रीडा स्पर्धेस नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये लगोरी, रस्सीखेच,पंजा लढविणे,पावन खिंड दौड,फुगडी,दंड बैठक,लेझीम, इत्यादी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.या पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत मुलांच्या लगोरी स्पर्धेत प्रथम क्रमांक तर लंगडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजने पटकावला आहे.तसेच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनी सुद्धा विटी दांडू खेळामध्ये विभागात प्रथम क्रमांक पटकाविला असल्याने गडचिरोली जिल्ह्यास दोन्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेंनी नागपूर विभागीय पारंपारिक क्रीडा कुंभ स्पर्धेत बहुमान मिळवून दिला आहे.बहुमान मिळवून दिल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुरेश एस.चौधरी यांनी दोन्ही संस्थेतील यशस्वी स्पर्धकांचे कौतुक केले.स्पर्धकांनी यशाचे श्रेय स्पर्धक प्रशिक्षणार्थी,क्रीडा समन्वयक निर्देशक,मार्गदर्शक, गटनिर्देशक यांना दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!