Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोली४५ वर्षीय मुख्याध्यापकाचे अल्पवयीन शाळकरी मुलींसोबत अश्लील कृत्य.. - भामरागड तालुक्याच्या जिल्हा...

४५ वर्षीय मुख्याध्यापकाचे अल्पवयीन शाळकरी मुलींसोबत अश्लील कृत्य.. – भामरागड तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भामरागड तालुक्याच्या कुक्कामेट्टा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अल्पवयीन शाळकरी मुलींसोबत चक्क शाळेतील मुख्याध्यापकानेच अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी मुख्याध्यापकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून भामरागड पोलीसांनी अटक केली आहे.रविंद्र उष्टुजी गव्हारे वय ४५ वर्षे,रा.ता.भामरागड,जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.
माहितीनुसार,गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेट्टा येथे रविंद्र गव्हारे बऱ्याच कालावधीपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे.त्यातच काही दिवसांपासून तो शाळेतील चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करीत होता.भीतीपोटी मुलींनी याची वाच्यता कुणाकडेही केली नाही.अशातच दोन पिडीत चिमुकल्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला.त्यामुळे घरच्यांनी धास्तावलेल्या मुलींना शाळेत न जाण्याचे कारण विचारले असता,शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे हे शाळेतील कार्यालयात कुणीही नसल्याची संधी साधून कुठल्याही बहाण्याने बोलावून वेळोवेळी अश्लील कृत्य करून याची वाच्यता केल्यास मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देत असतात,असे पालकांना पीडितांनी सांगितले.त्यामुळे दोन पिडीत चिमुकल्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला होता.सदर पालकांनी शाळेतील इतर मुलींच्या घरी जाऊन याबाबत माहिती घेतली असता,सदर प्रकार उजेडात आला.पालकांनी काल,बुधवारी ५ मार्चला भामरागड उपविभाग अंतर्गत येणाऱ्या उप-पोलीस स्टेशन लाहेरीच्या ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलीसांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेट्टाचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे विरुध्द कलम ७४,७५(२), ३५१(२)(३) भारतीय न्याय संहिता सहकलम ८,१०, १२,पोक्सो अधिनियम सहकलम ३ (१) (डब्लु) (i) (ii),३ (२) (Va) अनुसूचित जाती-जमाती कायदा अन्वये गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!