Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीअनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षण.. - प्रशिक्षण कालावधीत एक हजार रुपये...

अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षण.. – प्रशिक्षण कालावधीत एक हजार रुपये विद्यावेतन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी(महाराष्ट्र लोकसेवा आयोग) पुर्व प्रशिक्षण,जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरतीबाबत तसेच आयबीपीएस,स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) च्या परीक्षाबाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (emlpoyment card) असणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे.प्रशिक्षणा दरम्यान एक हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते.कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध असून अर्ज उद्या १ मार्च पासुन २७ मार्च २०२५ या कार्यालयात सादर करावेत,मुलाखत २८ मार्च रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थित राहावे. अधिक माहीतीसाठी ८४८५८१४४८८ (8485814488) या क्रमाकांवर संपर्क साधावा; असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!