Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीकर्तव्यावर असतांना हृदयविकाराचा झटका; पोलीस हवालदाराचा मृत्यू..

कर्तव्यावर असतांना हृदयविकाराचा झटका; पोलीस हवालदाराचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कर्तव्य बजावत असतांना एका ४९ वर्षीय पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी घडली.कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार वय ४९ वर्षे,रा.आलापल्ली,ता.अहेरी, जि.गडचिरोली असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
माहितीनुसार,संतोष मंथनवार हे कोरची तालुक्याच्या गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कर्तव्य बजावत असतांना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले व तितक्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्वप्रथम गॅरापत्तीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.प्रकृती गंभीर होत चालल्याने परत धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणी अंती तेथील डॉक्टरांनी संतोष मंथनवार यांना मृत घोषित केले.अवघ्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने मंथनवार कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!