- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे राज्य शासनाला महिलांना साडी वाटपात अडथळा निर्माण झाला होता.परंतु,यंदा मात्र बहिणींना वेळेत साडी देण्यासाठी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साडी देण्याचा उपक्रम शासन राबवीत आहे.यानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साडीचा लाभ मिळणार आहे.येत्या होळीच्या सणाला साडी वाटप होणार आहे.ही योजना केवळ अंत्योदय कार्डधारक लाभार्थी कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे.दुकानदाराने लाभार्थी कार्डधारकाकडून पीओएस मशीनवर नोंदणी स्वीकारल्यानंतर,त्याला प्रति कार्ड एक साडी दिली जाईल.यासाठी अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील एका सदस्याला रेशन दुकानात जाऊन ई-पॉश मशिनवर अंगठा लावावा लागेल. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे लाभार्थ्यांना साडी मिळाली नाही.मात्र,यंदा शिधापत्रिकाधारकांतील महिलांना येत्या होळीच्या सणाला साड़ी वाटप होणार आहे.
- Advertisement -

