Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरगुप्तधनासाठी गेले हनुमान मंदीरात; थेट पोहचले तुरुंगात - नागपूर येथील घटना..

गुप्तधनासाठी गेले हनुमान मंदीरात; थेट पोहचले तुरुंगात – नागपूर येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पाच झणांनी शक्कल लढवून गावात असलेल्या हनुमान मंदिराच्या जमिनीमध्ये गुप्तधन काढण्याकरिता गेले असता गावकऱ्यांना माहिती पडताच पाचही झणांना तुरुंगवासाची हवा खावी लागणार आहे.नागपुरातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर प्रकार घडला आहे. 

नागपुरातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावंगी देवळी गावात असलेल्या हनुमान मंदिराच्या जमिनीमधे गुप्तधन असल्याची कानकुन सुरू होती.त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या नादात पाचही आरोपींनी शक्कल लढवली; त्यानुसार रविवारी रात्री पाच आरोपींनी पायाळू महिलेला सोबत घेत भानामतीचे साहित्य घेत हनुमान मंदिर परिसर गाठला आणि तिथे खोदकामाला सुरुवात केली.पाच जणांच्या या कृत्याची माहिती गावातील काही लोकांना मिळळी.त्यानंतर गावकरी घटनास्थळी दाखल झाले.खोदकाम करतेवेळी शंकर सावरकर, विठ्ठल सोमांकर,बाबा टेंभूर्कर,वंदना गडकर,संदीप सहारे यांना अघोरी पूजा करतांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले.

गावकऱ्यांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनस्थळ गाठून अघोरी पूजेच्या साहित्यासह आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुप्तधन मिळवण्यासाठी भानामती करीत असल्याची कबुली दिली.पोलिसांनी हर्षल सोनावणे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!