- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, शुक्रवारी ७ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.हेमराज ज्ञानेश्वर जिचकार वय ४७ वर्षे,रा.४५० क्वॉर्टर नं.६/२४८,काटोल रोड, नागपूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
माहितीनुसार,नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून तैनात असलेल्या हेमराज जिचकार यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.जिचकार यांनी एक प्लॉट खरेदी केला होता.खरेदी केलेल्या प्लॉटचे ८ लाख रुपये त्यांनी दिले होते.परंतु रजिस्ट्रीची तारीख जवळ येत असतांना उर्वरित रकमेची जुळवाजुळव होत नसल्यामुळे ते आर्थिक तणावात होते.काल शुक्रवारी त्यांची साप्ताहिक रजा होती.त्यांची पत्नी बाहेर गेली होती.तर मुले शाळेत गेली होती.घरी एकटेच असतांना त्यांनी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.पत्नी घरी परतल्यानंतर त्यांना हेमराज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानुसार घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना देण्यात आली प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.हेमराज यांच्या पश्चात पत्नी,१२ वर्षाचा मुलगा व १० वर्षाची मुलगी आहे. कुटुंबाचा आधारवड गेल्याने जिचकार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

