Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी; केवायसी पासून होणार सुटका..

शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी; केवायसी पासून होणार सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या विविध कृषीसंलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रावर (सिएससी सेंटर) नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २० जानेवारीपासून ‘ॲग्रिस्टॅक’ (Agristack) डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या योजनेद्वारे शेतकरी माहिती संच तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) दिला जाणार आहे. जिल्ह्यात एक लाख ७८ हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १४ हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) का आवश्यक आहे?👇
ॲग्रिस्टॅक योजनेत नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा,पीक कर्ज,पीएम किसान सन्मान निधी आणि विविध सरकारी अनुदान योजनांचा लाभ सहज मिळू शकतो.या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण (C-KYC) करण्याची गरज राहणार नाही.
फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे👇
आधार कार्ड,आधारशी व बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा किंवा नमुना ८
नोंदणी प्रक्रिया👇
शेतकऱ्यांनी वरील आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे जाऊन नोंदणी करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!