- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान(सामान्य प्रशासन विभाग)शासन निर्णय दिनांक-१९ जानेवारी २०१८ अन्वये राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय,निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद,नगर पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १९६ ग्रामपंचायत स्तरावर व १४ नगर परिषद,नगर पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.)शासन निर्णय दिनांक-१९ जानेवारी,२०१८ च्या परिच्छेद १ (अ) व (आ) मधील निकषाप्रमाणे ग्राम पंचायतस्तरावर १९६ व नगर पंचायत स्तरावर १४ असे एकुण २१० आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रिक्त असलेल्या १९६ ग्राम पंचायत व १४ नगर परिषद,नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना,जिल्ह्याच्या वेबसाईट www.gadchiroli.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच रिक्त असलेल्या ग्राम पंचायत व नगर परिषद,नगर पंचायत स्तराची यादी व नमूना जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून अर्जदारांनी दिनांक-१० फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथिल सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे; असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
- Advertisement -

