Saturday, May 2, 2026
Homeनागपूरदोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अनुदानापासून राहावे लागणार वंचित..

दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अनुदानापासून राहावे लागणार वंचित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्यात लाडकी बहिण योजनेने धूम ठोकली आहे.जुलै २०२४ रोजी सुरू झालेल्या योजनेमुळे अनेक गोर-गरीब महिलांना महिण्याकाठी दीड हजार रुपये खात्यावर मिळू लागल्याने उदरनिर्वाहासाठी एकप्रकारे हातभार लागला आहे.अशातच लाडकी बहिण योजना व संजय गांधी निराधार या दोन्ही योजनांचा लाभ काही महिला घेत असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला निकष लावले जाणार आहेत.शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकणार आहेत.तरीही निराधार योनजेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत.या योजनेतून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी वगळण्यात आले आहेत,असे असले तरी काहीजण या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ नये,यासाठी आता पडताळणी केली जात आहे.यामध्ये लाभार्थ्यांना दोनपैकी केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
६५ वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी महिलांना यापैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.दरम्यान,संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही अनेकांनी कागदपत्रे जमा केलेली नाही.सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकूण अर्जापैकी सदोष किंवा मानवी चुकांमुळे त्रुटीयुक्त असण्याची शक्यता आहे.त्यामुळे कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे.या कागदपत्रांच्या आधारे योजनेच्या लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जाईल, यातून पात्र नसलेल्यांची नावे वगळली जातील. कागदपत्रच जमा झाले नाही तर अशांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.लाभार्थी शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचे अनुदान घेत आहेत.असे असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचेही अनुदान घेत आहेत,अशांना दोन पैकी एकाच योजनेचे अनुदान मिळेल,दुसऱ्या योजनेचे अनुदान बंद केले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!