Friday, May 1, 2026
Homeगोंदियाभरधाव पिकअपची दुचाकीला मागून धडक; तिघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी..

भरधाव पिकअपची दुचाकीला मागून धडक; तिघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच एका कुटुंबावर काळाचा घाला झाल्याची बातमी समोर आली आहे.गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांधकडे फिरायला जाणाऱ्या दुचाकी वाहनास भरधाव पिकअपने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार असलेली पत्नी,चिमुकला व शेजारील चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना काल,रविवार २६ जानेवारीच्या दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बाराभाटी मार्गावरील भारती बारसमोर घडली.अपघातात दुचाकी चालक संदिप राजू पंधरे वय २९ वर्षे गंभीर जखमी असून त्याला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.चितेश्वरी संदिप पंधरे वय २५ वर्षे,मुलगा संचित संदिप पंधरे वय ५ महिने घराशेजारील पार्थवी रोहीत सिडाम वय ३ वर्षे अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील संदिप राजू पंधरे वय २९ वर्षे हा तरूण मोटारसायकल क्रमांक-एम.एच.३५ ए एम २७५६ वरून पत्नी चितेश्वरी,मुलगा संचित व घराशेजारील मुलगी पार्थवी यांच्यासह नवेगावबांधकडे निघाले होते. बाराभाटी-नवेगावबांध मार्गावरील भारती बारजवळ पाठिमागून भरधाव येणाऱ्या पिकअपने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली.धडक बसताच अपघातात चितेश्वरी,संचित व पार्थवी या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर संदिप गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी संदिपला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयात नातेवाईकांसह येरंडी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने येरंडी गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!