Thursday, August 6, 2026
Homeमुंबईलाडक्या बहिणींना दिलासा; पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही- मंत्री...

लाडक्या बहिणींना दिलासा; पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही- मंत्री आदिती तटकरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अपात्र लाभार्थीकडून पैसे परत घेण्याबाबतचा सरकारने निर्णय घेतलेला नाही; असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणूक संपल्यामुळे राज्य सरकार अपात्र बहिणीकडून पैसे परत घेणार असल्याच्या चर्चेचे तटकरे यांनी काल,बुधवारी खंडन केले.त्या म्हणाल्या,राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून या योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही.मात्र,लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत.मात्र,आतापर्यंत आम्ही एकाही महिलेचे पैसे माघारी घेतलेले नाहीत किंवा हे पैसे परत घेण्याविषयी कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
काही महिलांनी नोकरी,नवीन गाडीची खरेदी, परराज्यात स्थलातंर आदी कारणांनी योजनेसाठी अपात्र ठरत असल्याने पैसे माघारी करण्यासाठी स्वतःहून शासनाला अर्ज केलेले आहेत.दररोज पाच-सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत.आम्ही त्यांच्याशी संपर्क करून कुठलीही माहिती अजून मागवलेली नाही.
एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी खिडकी तयार करून देतील.तेथे हे पैसे जमा होतील.आम्ही कोणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही.ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील,असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान,अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून त्यांना दिलेल्या रकमेची वसुली करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी मंगळवारीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!