Friday, September 4, 2026
Homeगोंदियाविद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवणाऱ्या शिक्षकास मध्यरात्री अटक..!

विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवणाऱ्या शिक्षकास मध्यरात्री अटक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शालेय शिक्षण घेत असतांना आई-वडीलांनंतर ज्याला आपण गुरू मानतो,तोच गुरू शाळेतील विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवत असेल तर इतके मोठे घोर ‘पाप’ या जगात कुठेही नाही; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये घडला असून प्रकरणी त्या शिक्षकावर काल,सोमवारच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अटक करून बाललैंगिक अधिनियमान्वये अत्याचारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील आत्माराम शेंडे वय ५२ वर्षे,रा.गांधी वॉर्ड, तिरोडा असे त्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
सुनील शेंडे हा तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत एनसीसी शिक्षक पदावर कार्यरत असून,दहाव्या वर्गातील १५ वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा.मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी शेंडे तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा.गुरुवारी १६ जानेवारीला पिडीत मुलगी सकाळी ८.३० वाजता शाळेत गेली असता आरोपीने आपल्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा हात पकडला.त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ऑफिसमध्ये तिचा उजवा हात पकडला.त्याच्या हाताला झटका देत ती मुलगी ऑफिसच्या बाहेर गेली.संधी मिळेल त्या ठिकाणी तो तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७४,७५ (१) (१) सहकलम ८,१२ बाल लैंगिक अत्याचार अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी शिक्षक सुनील शेंडे हा एनसीसीचा सराव करण्याच्या नावावर दर शनिवारी व रविवारी विद्यार्थ्यांना बोलवत होता.या सरावाच्या नावावर आरोपी त्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायचा.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!