Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा खुलासा; वाचा संपूर्ण प्रकरण...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा खुलासा; वाचा संपूर्ण प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.अटक केलेल्या सर्व आरोपींना सीआयडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे.
                संपूर्ण प्रकरण👇
६ डिसेंबर २०२४ ला सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे यास मारहाण केली. त्यामुळे अशोकने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले.मात्र,त्या ठिकाणी भांडण विकोपाला गेले आणि यात दोन गटात भांडण झाले.त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.यानंतर अशोक सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यात आवादा एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तक्रार दिली.त्यानुसार सुदर्शन घुले व इतर तीन जणांविरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.९ डिसेंबरला दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचे केज-मांजरसुबा हायवेवरच्या टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकऱ्यांनी अपहरण केले.अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली.पोलीस सुद्धा संतोष देशमुख याचा शोध घेऊ लागले.याच दरम्यान रात्री सहा साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला.६ डिसेंबरला ज्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबतच्या साथीदाराला मारहाण झाली त्यामध्ये प्रतिक घुले हाही होता आणि याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला प्रतीक घुले याचा वाढदिवस होता.वाढदिवसा दिवशीच आपल्याला मारहाण झाल्याचा राग प्रतीक घुलेच्या डोक्यात राहिला. त्यामुळेच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर प्रतीक घुले याने मारहाण करायला सुरुवात केली.संतोष देशमुखला मारहाण करतांना सुदर्शन घुले हा प्रत्येक वेळी विचारत होता की तू आम्हाला मारण्याची डेरिंग कशी केलीस आणि त्यानंतर व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरून केला हे वारंवार संतोष देशमुखला विचारत होता.६ तारखेला मारहाण झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने संतोष देशमुख यांना फायटर,गॅसचा पाईप आणि काठीने मारहाण केली.संतोष देशमुख यांचे अपहरण होण्यापूर्वी मस्साजोग मधीलच सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन घुले ला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगत होता.यादरम्यान संतोष देशमुख केजमधून निघाले यासह सगळ्या लोकेशनची माहिती ही सिद्धार्थ सोनवणे याने पुरवली होती.सुदर्शन घुले यांच्या स्कार्पिओ गाडीच्या मागे एक स्विफ्ट पांढरी गाडी होती जी जयराम चाटे याची आहे.संतोष देशमुख यांचा अपहरण झाल्यानंतर स्कार्पिओ गाडीच्या मागे जयराम चाटे याची गाडी होती. जयराम याने त्याच्या व्हाट्सअप ग्रुप वरील “मोकार पंती” या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुख यांना मारहाण होण्याच्या आधीचा व्हिडिओ दाखवला.या ग्रुपमधील चार ते पाच जण यांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल बघितला. संतोष देशमुख यांना जी मारहाण झाली त्यात प्रतीक घुले त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा प्रमुख हात होता.त्यानुसार आता वाल्मीक कराड सोडून इतर सात आरोपींवर मोकका(मोक्का) लावण्यात आला आहे.मोक्का म्हणजेच संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हत्या,खंडणी व इतर गुन्ह्यांसाठी लावण्यात येतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण...

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!