Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनागपूरसह विदर्भात आठवडाभर राहणार गारवा..

नागपूरसह विदर्भात आठवडाभर राहणार गारवा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसा ऊबदार व रात्री थंडगार वातावरणाचे सत्र सर्वत्र कायम आहे.२४ तासांत पुन्हा किमान तापमानात घसरण होऊन काही ठिकाणी ८.८ अंशाची नोंद आहे,जी विदर्भात सर्वात कमी आहे. त्यामुळे गारठा आणखी वाढला आहे.नागपूरसह विदर्भातही पुढचे आठ दिवस गारवा राहण्याचा अंदाज आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या दिवशीपासून १० अंशांच्या खाली गेलेले किमान तापमान त्याच ठिकाणी स्थिरावले आहे.रात्रीचा पारा सरासरीपेक्षा ३.८ अंशाने खाली असल्याने सूर्यास्त होताच हुडहुडीची जाणीव होत आहे.दिवसाचे तापमान मात्र रात्रीपेक्षा तीनपट व सरासरीपेक्षा २.८ अंशाने अधिक असल्याने काहीसा ऊबदार अनुभव येत आहे.हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार उत्तरेकडील वाऱ्यांमुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सामान्यापेक्षा कमी आहे.आठवडाभर असेच वातावरण कायम राहील,असा अंदाज आहे.१० जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टरबन्स तयार होत आहे.सध्या पश्चिमेकडील जेट स्ट्रीममुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे.त्यामुळे जोपर्यंत उत्तरेकडील वाऱ्यांचा मध्य भारतावर परिणाम होत राहील तोपर्यंत थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.पहाटेचा गारवा जातपर्यंत कुणालाही कंबलमधून बाहेर पडण्याची इच्छा नसते.सकाळी सूर्याची किरणे पडल्यावर बाहेर निघण्याचा विचार केला जातो.सावलीत हलकीशी थंडी जाणवते. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी ऊबदार कपड्यांचा वापर केला,तर रात्री उशिरा थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

‘पीएम-जनमन’ अंतर्गत तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार.. – योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे.प्रतिकूल कौटुंबिक...

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!