Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोलीमानव विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बसेस तातडीने सुरू करण्याचे निर्देश.. -...

मानव विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बसेस तातडीने सुरू करण्याचे निर्देश.. – बस आगाराला आमदार रामदास मसराम यांची भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत व इतर बस सेवा पाहिजे त्या प्रमाणात सुरू नसल्याने विद्यार्थी तथा सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.बसेस अभावी अनेकदा प्रवाश्यांना बसस्थानक परिसरात ताटकळत उभे राहावे लागते.त्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी गडचिरोली येथील बस आगाराला भेट देत मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व बससेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.तसेच कोरोना महामारीच्या कालावधीपासून बंद असलेल्या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात; असेही त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
विभागाच्या समस्या उघड👇
परिवहन विभागाने यावेळी त्यांच्या अनेक अडचणी मांडल्या.सध्या बसेसची संख्या खूपच कमी असून उपलब्ध बसेसही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.विभागात मेकॅनिक व चालकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून त्यामुळे सेवा सुरळीतपणे चालवणे कठीण झाले आहे.बससेवा नियमित करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याची तक्रारही विभागाने मांडली.
आमदारांचे निर्देश व आश्वासन👇
आमदार मसराम यांनी विभागाच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या तक्रारींची दखल विधानभवनात घेतली जाईल,असे आश्वासन दिले.त्यांनी स्पष्ट केले की,परिवहन विभागाच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पुरेसा निधी मंजूर करण्यासाठी ते विधिमंडळात प्रश्न मांडतील.उपलब्ध बसेस तातडीने दुरुस्त करून सेवेत आणण्याचे निर्देश दिले.मेकॅनिक आणि चालकांची भरती प्रक्रिया गतीने करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येची मुख्य गरज असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.बंद बससेवेचा परिणाम विद्यार्थी,कामगार आणि ग्रामीण जनतेवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील नागरिकांनी या भेटीमुळे समाधान व्यक्त केले असून लवकरच बसेस सुरु होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.आमदार मसराम यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे ग्रामीण भागातील वाहतूक समस्या लवकर सुटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी,सर्व गावचे सरपंच सोबतच माजी सभापती नाना नाकाडे,माजी सभापती परसराम टिकले,माजी उपसभापती नितीन राऊत,परशुराम ठाकरे,सागर वाढई,सरपंच कोंढाळा अर्पणा राऊत, तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे,बोडधाचे सरपंच राजू गायकवाड,विहिरगावच्या सरपंच भारती जुमनाके,  डोंगरगावच्या सरपंच वनमाला पुस्तोडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!