Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीकार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ९ नगरसेवकांना केले अपात्र...

कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ९ नगरसेवकांना केले अपात्र घोषित… – अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा निष्कर्ष…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बऱ्याच कालावधीपासून विविध प्रकरणांमुळे अहेरी नगरपंचायत नेहमी चर्चेत होती. नियमबाह्य निविदा प्रकरण,तत्कालीन मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्या विरोधातील अट्रॉसिटी प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळे अहेरी नगर पंचायतीतील सत्ताधारी गट चर्चेत होता.त्यातच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांचे नेते अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील वॉर्ड क्र.१० मध्ये नगर भूमापन क्र.७८० व ७६६ मधील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करुन बेकायदेशीररित्या बांधकाम केले होते.अशातच नगर परिषद प्रशासनाने त्यांना अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीसही बजावली होती.परंतु अहेरी नगरपंचायतीच्या ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या बांधकामाला संरक्षण देणारा ठराव पारित करण्यात आला.या विरोधात भाजपच्या वॉर्ड क्र.१५ च्या नगरसेविका शालिनी संजय पोहनेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप दाखल केला होता.त्यानुसार काल,मंगळवारी २४ डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी  नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह अन्य सात नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचा निष्कर्ष नोंदवून त्यांना अपात्र घोषित केले.यात नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,नौरास रियाज शेख,मीना ओंडरे, नगरसेवक विलास गलबले,विलास सिडाम व महेश बाकेवार अशी अपात्र ठरलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची नागपूर येथे बदली झाली असून त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी नगर पंचायतीच्या ९ नगरसेवकांना अपात्र घोषित केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!