Saturday, May 2, 2026
Homeनागपूरअल्पवयीन प्रेयसी सोबत बगीच्यात फिरणे प्रियकरास पडले महागात..! - एका चुकीने प्रेम-प्रकरण...

अल्पवयीन प्रेयसी सोबत बगीच्यात फिरणे प्रियकरास पडले महागात..! – एका चुकीने प्रेम-प्रकरण उजेडात आले आणि प्रियकराचे मंत्रच हरपून गेले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सुरुवातीला मैत्री नंतर प्रेम आणि शेवटी गुन्हा दाखल होऊन जेल.असाच काहीसा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.अल्पवयीन प्रेयसीच्या एका चुकीने प्रेम-प्रकरण उजेडात आले आणि प्रियकराचे मंत्रच हरपून गेले.अकरावीतील अल्पवयीन प्रेयसी आणि २३ वर्षीय प्रियकर बगीच्यात फिरायला गेले.फिरायला गेलेला व्हिडिओ प्रेयसीने सोशल मीडियावर अपलोड आणि भांडाफोड झाला.मुलीच्या भावाने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घरच्यांना तिचे प्रेमप्रकरण माहिती झाले.या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. कपिलनगर पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.प्रतीक शैलेंद्र वक्ते वय २३ वर्षे,रा.कपिलनगर, नागपूर असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. माहितीनुसार,पीडित मुलगी आई-वडील आणि भावासह कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी प्रतीकसोबत ओळख झाली.तो बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. दोघांचेही कॉलेज एकाच रस्त्यावर असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत होते.दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांना नेहमी मदत करायचे.प्रतीक एका खासगी कंपनीत कामाला जात होता.त्यामुळे तो तिला शिक्षणासाठीसुद्धा मदत करत होता.दोघांची मैत्री वाढून गाठीभेटी व्हायला लागल्या.त्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ला मुलीला प्रेमाची मागणी घातली. प्रतीकच्या प्रेमाला तिनेही साद दिली. दोघांचेही प्रेमसंबंध वाढले.मार्च महिन्यात त्याने मुलीला ‘सरप्राइज पार्टी’ असल्याचे सांगून फिरायला नेले.एका ढाब्यावर तिच्यासोबत जेवण केल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली.मात्र,तिने स्पष्ट नकार दिला.त्यामुळे प्रतीकने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर त्याने अनेकदा तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवल्याचेही समोर आले.मुलीने प्रियकरासोबत फिरायला गेल्यानंतर व्हिडिओ आणि फोटो काढले.काही दिवसांपूर्वीच तिने प्रतीकसोबत एका बगीच्यात फिरत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला.त्यात प्रेमाचे गीतसुद्धा घातले.दोन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ तिच्या भावाने बघितला.त्याने बहिणीचे प्रेमप्रकरण आईवडिलांना सांगितले.कुटुंबीयांनी मुलीला विचारणा केली असता तिने प्रतीकसोबत प्रेम असून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले.तसेच शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या कुटुंबीयांनी तिला कपिलनगर पोलिस ठाण्यात नेले.त्यानुसार प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!