- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे अनुदान थकले आहे. घरकूल मंजूर झाल्यामुळे त्यांनी जुनी घरे पाडली. पहिला हप्ता मिळताच बांधकाम सुरू केले.परंतु, निम्म्याहून अधिक लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला नाही.
बांधकाम रखडल्याने लाभार्थीसुद्धा हवालदिल झाले आहेत.ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यसरकारतर्फे इतर घरकूल योजनांच्या धर्तीवर मोदी आवास योजना राबविण्यात येत आहे.जिल्ह्यात ओबीसी व एसबीसी प्रवर्गाकरिता पहिल्या वर्षी २०२३-२४ या आर्थिक वर्षात हजारो घरकुलांचे उद्धिष्ट देण्यात आले.पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले. तथापि नियमित अनुदानाअभावी ही योजना रेंगाळली आहे. बांधकामासाठी असलेले पैसे संपल्याने काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे.घरे बांधून पूर्ण होत आली,तरी लाभार्थ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही.अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करत घराचे बांधकाम केले असून लाभार्थ्यांना घरकुल अनुदानाची प्रतीक्षा आहे.घरकूल योजनेतून घर बांधकामासाठी साहित्य आणि मजुरी असे १ लाख ४६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. अनुदानाअभावी काही घराचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.देसाईगंज पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार,मोदी आवास योजना सोडून इतर सर्व योजनेचे अनुदान आलेले आहेत.त्यामुळे मोदी आवास घरकूल योजनेच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून तात्काळ उपलब्ध व्हावी; अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
- Advertisement -

