- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कलयुगात देव प्रत्यक्षात जरी दिसत नसला,तरीही त्याचे दर्शन हे कोणत्या ना कोणत्या तरी रुपात होत असतेच.आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग जरी असले तरीही श्रध्दाळू मोठ्या भक्तीभावाने भगवंताच्या चरणी माथा टेकवून मन हलके करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंदिरात जात असतात.अश्याच प्रकारे एक भक्त देवाच्या चरणी माथा टेकवून दानपेटीत पैसे टाकण्यासाठी खिशातून नोटा काढत असतांना चुकून आयफोन दानपेटीत पडला अन् भगवंताचाच झाला असल्याची घटना उघडकीस आल्याने सर्वत्र याची चर्चा रंगू लागली आहे.चेन्नईजवळील थिरुपूरूर येथील अरुल्मिगु कंदस्वामी मंदिरात एका भक्ताचा अनवधानाने दानपेटीत आयफोन पडला.परिणामी मंदिराने फोन आपली मालमत्ता असल्याचे जाहीर केले.त्यामुळे विनयगापूरम येथील भक्त दिनेशला शुक्रवारी रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.कारण मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले की,दानपेटीत जे काही टाकले आहे ते देवतेचे आहे.मात्र,त्यांनी त्याला सिमकार्ड देण्याची आणि फोनवरून डेटा डाउनलोड करण्याची परवानगी दिली. दिनेश महिनाभरापूर्वी कुटुंबासमवेत मंदिरात गेला होता आणि पूजा झाल्यानंतर दानपेटीत काही पैसे टाकण्यासाठी गेला होता.तो म्हणाला की,तो शर्टाच्या खिशातून नोटा काढत असतांना चुकून त्याचा आयफोन दानपेटीत पडला.दानपेटी उंचीवर ठेवल्याने त्याला फोन काढता आला नाही.घाबरलेल्या दिनेशने मंदिराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.तथापि, त्यांनी त्याला सांगितले की,एकदा प्रसाद दानपेटीत टाकला की,तो देवतेचा मानला जातो आणि तो परत करता येत नाही.शिवाय,परंपरेनुसार,दानपेटी दोन महिन्यातून एकदाच उघडली जाते.त्यामुळे दानपेटीत पडलेला मोबाईल हा मंदिरात ठेवला जाणार आहे.
- Advertisement -

