Thursday, August 27, 2026
Homeगोंदिया९ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या ३६ वर्षीय नराधमास अटक...

९ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या ३६ वर्षीय नराधमास अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका ९ वर्षीय चिमुकलीचा ३६ वर्षीय नराधमाकडून विनयभंग केल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका गावात उघडकीस आला. प्रकरणी पोलिसांनी नराधमास बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाने घराबाहेर खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीला आपल्या घरी बोलावून विनयभंग केला.नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रजनीकांत कमलदास वालदे वय ३६ वर्षे याने त्याच्याच गावातील ९ वर्षीय चिमुकली सोबत खेळून दुपारी १ वाजताच्या सुमारास चिमुकली आपल्या घरी जात असतांना तिला जबरदस्तीने पकडून आपल्या घरी नेले.वाईट स्पर्शाची व अतीप्रसंग केला जाणार असल्याचे लक्षात येताच चिमुकलीने रजनीकांतच्या हाताला चावा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.घरी जाऊन घडलेला प्रसंग तिने कुणालाही सांगितला नाही.मात्र,काही दिवसांनंतर त्या चिमुकलीची प्रकृती बिघडली.तिला गंभीर आजार झाल्याने तिच्या आईने तिला विचारणा केली.त्यानंतर संपूर्ण हकीकत तिने तिच्या आईला सांगितले.त्यानुसार चिमुकलीचे बयाण आणि तक्रारीच्या आधारे नवेगावबांध पोलिसांनी रजनीकांत वालदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक वैशाली घनमारे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!