Thursday, October 8, 2026
Homeनागपूरपिकाची नोंद करण्यासाठी दोन हजाराची लाच... - २८ वर्षीय महिला तलाठ्यासह मदतनीस...

पिकाची नोंद करण्यासाठी दोन हजाराची लाच… – २८ वर्षीय महिला तलाठ्यासह मदतनीस एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शासनाच्या वतीने भ्रष्टाचार रोखण्यासाठी कितीही कठोर नियम वा कायदे आणले तरीही लाचखोरांवर त्याचा जराही फरक पडणार नाही; कारण पैश्याची लालच ही न थांबणारी हातगाडी आहे.सातव्या वेतन आयोगानुसार भरपूर वेतन असूनही अगदी ५० रुपयांपासून ते हजार-दोन हजार रुपयांसाठी प्रतिमा मलिन करणाऱ्यांची या देशात कमी नाही; असाच काहीसा प्रकार उमरेड तहसील कार्यालयात काल,मंगळवारी १७ डिसेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस येऊन सातबारावर पिकाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका २८ वर्षीय महिला तलाठ्यासह मदतनीस म्हणून ठेवलेल्या अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली आहे.रूपाली अरविंद मानकर व आशिष गुलाब देशमुख रा.ठाणा,ता.उमरेड असे अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत.रूपाली मानकर ह्या कळमना,ता.उमरेड येथील तलाठी कार्यालयात कार्यरत होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की,उमरेड तालुक्याच्या म्हसाळा (दिघोरी) येथील तक्रारकर्त्याच्या आईच्या नावाने म्हसाळा (दिघोरी) शिवारात शेती आहे.सदर शेती जंगलव्याप्त परिसरात असल्याने वन्यप्राण्यांचा शेतात नेहमी वावर असतो.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे नुकसानीला सामोरे जावे लागते.तक्रारकर्त्याने यावर्षी शेतात कपाशीची लागवड केली होती.वन्यप्राण्यांनी त्याच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने त्याने वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.नुकसान भरपाई मिळण्यासाठी सातबारावर कपाशीच्या पेऱ्याची नोंद हवी होती. त्यासाठी त्याने महिला तलाठीकडे नोंद करण्यासाठी साकडे घातले.नोंद करण्यासाठी रूपाली मानकरने त्याला तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे तरुणाने मान्य केले.त्याला लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली.ठरल्याप्रमाणे रूपाली मानकरने आशिष देशमुखच्या माध्यमातून ही लाच स्वीकारली.लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत दोघांनाही अटक केली.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!