Friday, October 9, 2026
Homeनागपूरबाहेरचे मंत्री भूषविणार गडचिरोलीसह सात जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद..

बाहेरचे मंत्री भूषविणार गडचिरोलीसह सात जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाचा सोहळा राज्याच्या उपराजधानीत नुकताच पार पडला असून विदर्भातील सात जिल्ह्यांना मंत्री पदापासून वंचित ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यासह सात जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद बाहेरचे मंत्री भूषविणार असल्याचे दिसून येत आहे.यात गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा, अकोला,अमरावती व वाशिम इत्यादींचा समावेश आहे.तर,नागपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी ३ मंत्रिपद मिळाली आहेत.पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांना पालकमंत्रिपदासाठी तर कायम प्रतीक्षाच करावी लागली आहे.अशातच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती व वाशिम या तीन मोठ्या जिल्ह्यांनाही एकही मंत्रिपद मिळाले नाही. गडचिरोली व चंद्रपूर ही दोन्ही जिल्हे मंत्री पदाविना पोरकीच झालीत. आजवरच्या मंत्रिमंडळात चंद्रपूर,अकोला,अमरावती या तीन जिल्ह्यांच्या नशिबी कायम मंत्रीपद येत होते.काँग्रेस आघाडीचे सरकार असो की,महायुतीचे सरकार या जिल्ह्याला मंत्रिपद मिळायचे. यावेळी मात्र फडणवीस सरकारने या जिल्ह्यातून एकालाही संधी दिली नाही.चंद्रपूर हा जिल्हा कायम मंत्रिपद मिळणारा म्हणून प्रसिध्द होता.भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काँग्रेसची सत्ता असतांना माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करायचे.भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना वगळून मोठा धक्काच दिला आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यालाही मंत्रिमंडळात पद टिकवून होते.परंतु,या दोन्ही जिल्ह्यांना यंदा स्थान नाही.गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही जिल्ह्यांना विदर्भाबाहेरील पालकमंत्रिपद मिळत आहे. गडचिरोलीलाही प्रतिनिधित्व मिळाले नाही. राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याने पुन्हा एकदा बाहेरचा मंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषवेल.यापूर्वी तत्कालीन युती सरकारमध्ये मंत्री असलेले विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले होते.अशातच आता अनेक जिल्ह्यांना भोपळा मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!