Friday, October 9, 2026
Homeनागपूरअखेर महायुतीच्या ३९ आमदारांनी नागपुरात घेतली मंत्रिपदाची शपथ.. - पहा संपूर्ण नावे;...

अखेर महायुतीच्या ३९ आमदारांनी नागपुरात घेतली मंत्रिपदाची शपथ.. – पहा संपूर्ण नावे; अनेकजण मंत्री पदापासून वंचित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या राजभवनावर आज,रविवार १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपच्या सर्वाधिक १९ जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या ११,तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांचा समावेश आहे.गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून २५ नवे चेहरे दिले आहेत.२८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत केवळ १५% म्हणजेच ४३ सदस्य मंत्री होऊ शकतात.आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे-पवार यांच्यासह ४२ मंत्री आहेत.
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल,असे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथविधीपूर्वीच सांगितले आहे.महायुतीच्या सर्व आमदारांना हा नियम लागू होणार आहे.त्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतलेले 👇
१. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
२. संजय सावकारे (भाजप)
३. संजय शिरसाट (शिवसेना)
४. प्रताप सरनाईक (शिवसेना)
५. भरत गोगावले (शिवसेना)
६. मकरंद पाटील (राष्ट्रवादी)
७. नितेश राणे (भाजप)
८. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
९. अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
१०. शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
११. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
१२. जयकुमार गोरे (भाजप)
१३. आकाश फुंडकर (भाजप)
१४. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
१५. प्रकाश आबिटकर (शिवसेना)
१६. माधुरी मिसाळ (भाजप)
१७. आशिष जैस्वाल (शिवसेना)
१८. पंकज भोयर (भाजप)
१९. मेघना बोर्डीकर (भाजप)
२०. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
२१. योगेश कदम (शिवसेना)
२२. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
२३. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
२४. चंद्रकांत पाटील (भाजप)
२५. गिरीश महाजन (भाजप)
२६. गुलाबराव पाटील (शिवसेना)
२७. गणेश नाईक (भाजप)
२८. दादा भुसे (शिवसेना)
२९. संजय राठोड (शिवसेना)
३०. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
३१. मंगलप्रभात लोढा (भाजप)
३२. उदय सामंत (शिवसेना)
३३. जयकुमार रावल (भाजप)
३४. पंकजा मुंडे (भाजप)
३५. अतुल सावे (भाजप)
३६. अशोक उईके (भाजप)
३७. शंभुराज देसाई (शिवसेना)
३८. आशिष शेलार (भाजप)
३९. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मंत्री पदापासून वंचित👇
तानाजी सावंत,अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,छगन भुजबळ,दिलीप वळसे-पाटील,अनिल पाटील,संजय बनसोडे,सुधीर मुनगंटीवार,विजयकुमार गावित,रविंद्र चव्हाण,सुरेश खाडे,धर्मराव बाबा आत्राम.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!