- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात दरवर्षी नक्षल्यांकडून पीएलजीए(पीपल्स लिबरेशन गुर्रिल्ला आर्मी)सप्ताह पुकारला जातो.२ डिसेंबर २००० रोजी नक्षल्यांनी पीपल्स लिबरेशन गुर्रिल्ला आर्मी या सशस्तर संघटनेची स्थापना केली.तेव्हापासून नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबर या कालावधीत पीएलजीए सप्ताह साजरा करतात.या कालावधीत ते हिंसक कारवाया करतात.परंतु पीएलजीए सप्ताहाच्या आजच्या पहिल्या दिवशी कुठेही अनुचित घटना घडली नाही.दुर्गम भागातील वाहतूक आणि बाजारपेठा सुरळीत सुरु होत्या; अशातच नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भामरागड दलमची सदस्य असलेल्या तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दस्सा कुळमेथे वय २८ वर्षे या नक्षल महिलेने आज,सोमवार २ डिसेंबरला गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले आहे.तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दस्सा कुळमेथे ही अहेरी तालुक्यातील नैनेर येथील रहिवासी आहे.२०१६ मध्ये ती अहेरी दलममध्ये भरती झाली.पुढे २०१८ मध्ये तिची बदली भामरागड दलममध्ये झाली.आजतागायत ती तेथे कार्यरत होती.
- Advertisement -

