Saturday, September 5, 2026
Homeगोंदियामोठी बातमी... १० जणांचा घटनास्थळीच मृत्यू; शिवशाही बसचा भीषण अपघात...

मोठी बातमी… १० जणांचा घटनास्थळीच मृत्यू; शिवशाही बसचा भीषण अपघात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून १० जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली.या अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज,शुक्रवारी दुपारी साडेबारा ते १ वाजेच्या दरम्यान शिवशाही बस क्रमांक-एमएच ९ ईएम १२७३ बस नागपुरहून गोंदियाकडे जात होती.खजरी व डव्वा गावाजवळ आल्यानंतर दुचाकी अचानक समोर आली.दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बसमधून ७ ते ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.सध्या बचाव कार्य सुरू आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान,या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली.तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत,अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.त्यासोबतच मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनीही एक्सवर ट्विट करीत या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या घटनेत जे लोक जखमी झाले,त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश दिले.आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा; असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!