Tuesday, July 28, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे नवमतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

कोंढाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे नवमतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा :- देसाईगंज शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ७ फेब्रुवारी २०२३ ला कोंढाळा येथे नवमतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून गावातील नवमतदार नागरिकांना जागृत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.रॅली नंतर मार्गदर्शक म्हणून एम.ए. मेहर तहसील कार्यालय देसाईगंज यांनी मतदार नोंदणी विषयी गावकऱ्यांना माहिती दिली, विद्यानिकेतन लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एम.देशमुख,हर्षे सर,जिल्हा परिषद कोंढाळा शाळेतील विध्यार्थ्यानी व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गांनी व रासेयोच्या स्वयंसेवकांना उत्कृष्टपणे सहभाग घेतला होता.लोकशाहीचे महत्व समजावून सांगितल्या गेले व सोबतच मतदार हा भारतीय लोकशाहीचा  कणा आहे.याचे महत्व पटवून देण्यात आले.भारतीय निवडणूक आयोगाला सहकार्य करून आपल्या लोकशाहीला मजबूत करा;असेही रॅलीदरम्यान पटवून सांगितले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टी.आर.खोब्रागडे यांनी भुषविले तर मुख्य अतिथी सरपंचा अपर्णाताई राऊत,प्रमुख अतिथी मुख्याध्यापक अनिल मुलकलवार यांनी भूषविले होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.ए.मेहर,उमेश ठलाल तहसील कार्यालय देसाईगंज,तसेच या कार्यक्रमाला गटनिर्देशक  आर.एम.गोतमारे,डी.वि.सूर आणि औधोगिक  प्रशिक्षण संस्था येथील ए.वि.भोले,सी.डी.समर्थ, बी.बी.घरडे,हेमंत मरसकोल्हे,सतीश मेश्राम,लता लाडे, एस.एस.प्रधान व रासेयो समन्वयक सी.एम.गरमळे, सह-समन्वयक व्ही.वाय नागमोती उपस्थित होते. 

सदर कार्यक्रम एस.एस.चौधरी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!