- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा आज,रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विदर्भात प्रचाराचा झंझावात दौरा राहणार आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज(वडसा) येथे आरमोरी विधानसभा मदारसंघाचे उमेदवार रामदास मळूजी मसराम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा देसाईगंज शहराच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूला लागून असलेल्या आवारात होणार आहे.तर नागपूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौक येथे आयोजित ‘रोड शो’मध्ये त्या सहभागी होणार आहेत.प्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसजणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रियांका गांधी यांचे आज,रविवारी सकाळी ११.२५ वाजता विशेष विमानाने दिल्लीहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी ११.३० वाजता त्या तेथूनच हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे रवाना होतील. देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत त्या मार्गदर्शन करतील.ही सभा आटोपून त्या दुपारी २ वाजता नागपूर विमानतळावर पोहचतील.नागपूर शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौकापासून प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे.या रोड शोमध्ये दुपारी ३.४५ वाजता त्या सहभागी होतील.नंतर सायंकाळी ६ वाजता त्या विशेष विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील.
- Advertisement -

