Friday, October 9, 2026
Homeनागपूरवाट भरकटलेला बिबट्या पडला विहीरीत.. - बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागास यश

वाट भरकटलेला बिबट्या पडला विहीरीत.. – बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागास यश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शिकारीच्या शोधात वाट भरकटलेला बिबट्या काटोल तालुक्यातील सावळी (खुर्द) शिवारात आला आणि शेतातील विहिरीत पडला. सदरची बाब लक्षात येताच शेतकऱ्याने वन अधिकाऱ्यांना माहिती दिली.वनकर्मचाऱ्यांनी त्याला  रेस्क्यू करीत विहिरीतून सुखरूप बाहेर काढले आणि तपासणीसाठी नागपूरला पाठविले.
रमेश नामदेव सातपुते,रा.सावळी (खुर्द),ता.काटोल यांचे गावालगत शेत आहे.बुधवारी सकाळी त्यांनी शेतातील विहिरीतून आवाज येत असल्याने उत्सुकतेपोटी विहिरीत डोकावून बघितले,तेव्हा त्यांना आत बिबट्या पडला असल्याचे दिसले.त्यांनी लगेच काटोल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना तसेच काटोल पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच सेमिनरी हिल्स,नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळ गाठले.त्यांनी बिबट्याला व्यवस्थित बाहेर काढले आणि पिंजऱ्यात जेरबंद केले.शिवाय, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला नागपूर शहरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पाठविण्यात आले.त्याच्या रेस्क्यूच्यावेळी घटनास्थळी उपवनसरंक्षक डॉ.भारतसिंह हाडा,सहायक वनसरंक्षक पाखले, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.डब्ल्यू,नरखेडकर,सी.व्ही. नान्हे,जे.ए.राऊत वाय.एम.रेवतकर,व्ही.बी.डोळस, एस.एच.नितनवरे,रेस्क्यू टीमचे किनकर,प्रतीक घाटे,आशिष महल्ले,चेतन बारस्कर,बंडू मंगर,प्रकाश गायकवाड,महेश मोरे,विलास ढोरे आदी उपस्थित होते.
ज्या विहिरीत बिबट्या पडला,त्या विहिरीचा काठ जमिनीला समांतर आहे.हा बिबट्या शिकारीच्या शोधात शिवारात आला.त्याला अंधारात विहीर व्यवस्थित दिसली नाही.त्यामुळे तो आत पडला असावा,अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याला पकडून बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला होता.त्या पिंजऱ्यात खाद्य म्हणून कोंबडी ठेवली होती.कोंबडीवर ताव मारण्यासाठी बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दार बंद होताच आत अडकला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!