- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान येत्या २० नोव्हेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी २२ ऑक्टोंबर ते २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.राज्यात महाविकास आघाडी,महायुती तसेच इतर मित्र पक्ष मिळून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.अशातच निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्यांच्या विरोधात काहींनी बंड पुकारून सुरुवातीला तसेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्याने अधिकृत पक्षांची मोठी गोची निर्माण झाली आहे.असाच प्रकार गडचिरोलीतील विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.त्यात जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसमधील नाराजांनी बंडखोरी केली.त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची कोंडी झाली आहे.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समजावू,विनंती करू,ऐकलेच नाही,तर बाहेरचा रस्ता दाखवू,अशा शब्दांत बंडखोर उमेदवारांना इशारा दिला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी काल, ३० ऑक्टोंबर रोजी पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले उमेदवारांची निवड ही योग्यतेनुसार केलेली आहे.त्यामुळे अधिकृत उमेदवारामागे उभे राहण्याऐवजी कोणी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले असतील तर त्यांना समजावून सांगू,प्रसंगी विनंतीही करू,पण न ऐकल्यास हकालपट्टीही करू,असा दम त्यांनी भरला.यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान,मनोहर पोरेटी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार,ॲड.राम मेश्राम,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड.कविता मोहरकर,माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी आदी उपस्थित होते.
- Advertisement -

