Friday, September 4, 2026
Homeनागपूरप्रेसयीच्या मदतीने मौज-मस्तीसाठी प्रियकराने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर घातला डल्ला..! - शेवटी चोरीचे बिंग...

प्रेसयीच्या मदतीने मौज-मस्तीसाठी प्रियकराने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर घातला डल्ला..! – शेवटी चोरीचे बिंग फुटले आणि प्रियकर अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रियकराला त्याच्या प्रेयसीसोबत प्रेमविवाह करायचा होता.मात्र,त्याने प्रेसयीच्या मदतीने तिच्याच घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आणि त्या पैशातून मौजमस्ती केली.शेवटी या चोरीचे बिंग फुटले आणि प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.ही घटना खापरखेडा येथे नुकतीच घडली,अटकेनंतर त्याच्याकडून एकूण ४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कातलाम यांनी दिली.ललितकुमार परमार रा.खापरखेडा,ता.सावनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे.फिर्यादी महिला ही चनकापूर,ता.सावनेर येथील रहिवासी आहे.फिर्यादीने तिच्या घरी चोरी झाल्याची तक्रार गुरुवारी २४ ऑक्टोंबरला पोलिसांत दाखल केली होती.चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख १५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.त्याअनुषंगाने खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरण तपासात घेतले.या चोरीशी फिर्यादीच्या मुलीच्या प्रियकराचा संबंध असल्याचे फिर्यादी व पोलिसांच्या लक्षात आले.
परिणामी,पोलिसांनी ललितकुमारला ताब्यात घेत विचारपूस केली.गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली.त्याच्याकडून ४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३०५,३३१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला आहे.
फिर्यादीची मुलगी आणि ललितकुमारचे प्रेमप्रकरण दोन वर्षांपासून सुरु होते.प्रेमविवाह करण्याचा दोघांचा विचार होता.दोघांनाही मौजमस्ती करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याने तिच्या घरातून टप्प्याटप्प्याने दागिने चोरून नेले आणि ते गहाण ठेवून पैशाची उचल केली.त्या रकमेत दोघांनी मौजमस्ती केली.काही रक्कम त्याने दारू पिणे आणि जुगार खेळण्यात खर्च केली,गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यास त्याच्याकडे पैसे नव्हते.मध्येच दागिने गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले आणि बिंग फुटले.
आरोपीने ६ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच हजार रुपये रोख,तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र,चार ग्रामचे सोन्याचे कानातील दागिने,तीन तोळ्याचा सोन्याचा चपलाकंठी हार,एक तोळ्याची सोन्याची चेन,अडीच ग्रामची सोन्याची रिंग,तीन ग्रामचे सोन्याचे कानातील झुमके,पाच तोळ्याच्या चांदीच्या तोरड्या असा एकूण ४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!