Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील त्रेचाळीसाव्या सत्रात रोशन येमुलवार विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील त्रेचाळीसाव्या सत्रात रोशन येमुलवार विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोली च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे त्रेचाळीसावे  सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर  जिल्ह्यातील कवी रोशन येमुलवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “शेतकऱ्यांची दिवाळी” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
रोशन येमुलवार हे पोंभुर्णा,जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत.त्यांना कविता लिहीण्याचा व वाचनाचा छंद आहे.वेगवेगळ्या विविध वृत्तपत्रांतून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात. लवकरच प्रकाशित होणाऱ्या रानगर्भातील रानफुले या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या त्रेचाळीसाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने अजय राऊत,ऊकंडराव नारायण राऊत,प्रा.पी.एस.बनसोडे, प्रा.रोहिणी पराडकर,राजेंद्र यादवराव सोनटक्के, राजरत्न पेटकर,सुजाता अवचट,पी.डी.काटकर,नरेंद्र गुंडेली,पुनाजी कोटरंगे,संगीता ठलाल,वंदना मडावी, सोनाली रायपुरे-सहारे,माधुरी अमृतकर,संतोष कपाले, लता शेंद्रे,मुरलीधर खोटेले,गजानन गेडाम,सुभाष धाराशिवकर,यामिनी मडावी,प्रिती ईश्वर चहांदे, तुळशीराम उंदीरवाडे,जयराम धोंगडे,वंदना सोरते,  रेखा दिक्षित,वामनदादा गेडाम,रोशन येमुलवार,संगीता रामटेके,शैला चिमड्यालवार,मधुकर दुफारे,प्रब्रम्हानंद मडावी,केवळराम बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!