Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपत्नी सरकारी बँकेत नोकरीला; तिला ७० हजार रुपये महिना..- कमावत्या पत्नीला पोटगी...

पत्नी सरकारी बँकेत नोकरीला; तिला ७० हजार रुपये महिना..- कमावत्या पत्नीला पोटगी कशी द्यायची…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-एका पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कमावत्या पत्नीला पोटगी मागण्याचा अधिकार नाही; असा दावा केला आहे.याकरिता,फौजदारी प्रक्रिया संहितेमधील तरतुदीचा आधार घेण्यात आला आहे.उच्च न्यायालयाने यासह इतर प्राथमिक मुद्दे विचारात घेता पत्नीसोबतच दोन वर्षीय मुलीच्या तात्पुरत्या पोटगीलाही अंतरिम स्थगिती दिली आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील पती आशिष नाशिक तर, पत्नी अश्विनी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे २६ फेब्रुवारी २०११ रोजी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान, अश्विनीचे अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आशिष-अश्विनीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडून वाद विकोपाला गेला.परिणामी,अश्विनी माहेरी निघून गेली.

अश्विनीने फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १२५ अंतर्गत पोटगीसाठी तर, आशिषने हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोटासाठी यवतमाळ कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला. कुटुंब न्यायालयाने २४ जून २०२४ रोजी या दोन्ही प्रकरणांमध्ये पत्नीला एकूण १० हजार तर,मुलीला तब्बल २० हजार रुपये महिना तात्पुरती पोटगी मंजूर केली.त्या निर्णयावर पतीचा आक्षेप आहे.हा निर्णय देताना आवश्यक बाबींचा विचार केला गेला नाही; असे पतीचे म्हणणे आहे.
ॲड.महेश धात्रक यांनी पतीची बाजू मांडताना विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १२५(१) अनुसार,स्वतःची देखभाल करण्यास असक्षम असलेली पत्नीच पतीला पोटगीची मागणी करू शकते.कमावत्या पत्नीला पोटगी देण्याची तरतूद कायद्यात नाही.या प्रकरणातील पत्नी सरकारी बँकेत नोकरी करीत असून,तिला ७० हजार रुपये महिना वेतन मिळतो.या रकमेत ती स्वतःसह मुलीची देखभाल करू शकते.परिणामी,तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही.याशिवाय,तिने स्वतःहून सासरचे घर सोडले आणि तिचे अनैतिक संबंधही होते. यामुळेदेखील ती पोटगीकरिता अपात्र आहे; असे ॲड. धात्रक यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!