Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईआचारसंहिता कालावधीतील सरकारने १०३ जीआर घेतले मागे... - योजनादूतांकडून प्रचार थांबविण्याची...

आचारसंहिता कालावधीतील सरकारने १०३ जीआर घेतले मागे… – योजनादूतांकडून प्रचार थांबविण्याची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-सरकारने मागील महिन्यांत योजनांचा धडका लावल्याने शासकीय योजनांची प्रचार,प्रसिद्धी  करण्याकरीता ग्रामपंचायत स्तर व इतर शासकीय कार्यालयांमध्ये योजना दुतांची नियुक्ती केली होती.मात्र,सध्या स्थितीत विधानसभा निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आचारसंहिता कालावधीत कोणत्याही शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी करता येत नाही.आचारसंहिता सुरू असेपर्यंत योजनादूतांमार्फत कोणत्याही प्रकारचे प्रचार प्रसिद्धीचे काम करण्यात येऊ नये; अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत.आयोगाने यासंदर्भात जिल्हास्तरीय अंमलबजावणी यंत्रणांनाही सूचना दिल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काल,शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची भेट घेऊन या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते.तसेच, फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे वगळली जात असून त्यामागे षडयंत्र असल्याची तक्रार करत फॉर्म ७ स्वीकारणे बंद करण्याची मागणी मविआ नेत्यांनी यावेळी आयोगाकडे केली.राज्य सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली नाही; अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
आचारसंहिता १५ तारखेला ज्या वेळेपासून लागू झाली.त्यानंतर राज्य सरकारने आपल्या वेबसाइटवर काही जीआर टाकले असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार आयोगाने आचारसंहिता लागू झालेल्या वेळेनंतर टाकलेले जीआर मागे घेण्याच्या सूचना सरकारला केली होती.त्यानुसार सरकारने १०३ जीआर मागे घेतले आहेत; असेही त्यांनी सांगितले
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!