- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सुजागड लोहखनिज खाणीतील रोड रोलरने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास चिरडल्याची घटना आज,शनिवार २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुलचेरा तालुक्याच्या चुरटूगुट्टा गावात घडली.झालेल्या अपघातात चुरटूगुट्टा गावातील दशरथ सीताराम आत्राम वय ४० वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी सुजागड खाणीतील अनागोंदी कारभाराप्रती संताप व्यक्त करीत कंपनीचे मालक घटनास्थळी जो पर्यंत येणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही,असा आक्रमक पवित्रा घेतला होता.
सुजागड खाणकामामुळे मुलचेरा,एटापल्ली व परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावरील सततची धूळ,खाचखड्डे,शालेय विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अश्यातच आज शनिवार दुपारच्या सुमारास चुरटूगुट्टा गावातील दशरथ आत्राम हे घरून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत येथे काही कामानिमित्त पायी चालत जात होते.घरापासून काही अंतरावर जाताच सुजागड लोहखनिज खाणीतील रोड रोलरने त्यांना चिरडले. यात दशरथ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच सरपंच,गावकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक पवित्रा घेतला.कंपनीचे मालक व प्रशासन जोपर्यंत घटनास्थळी येणार नाही व मृतकाच्या कुटुंबीयांना भरपाई देणार नाही,तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही,असा पवित्रा घेतल्याने गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचेही जीव धोक्यात आल्याने सुजागड खाणकामाच्या प्रशासनाप्रती नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
- Advertisement -

