उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील साखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी बोरकुटे यांना गाव स्तरावरील महिला सक्षमिकरण, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करणे व गाव विकासाचे दृष्टीने महत्वाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार दिनांक- ३ डिसेंबर २०२३ ला दिल्ली येथे constitution club of india च्या विशेष समारंभात अर्जुन राम मेघवाल आदीला फाऊंडेशन दिल्ली,डॉ.एस.आदिनारायण,डॉ.राजीव मेमन,डॉ. मनिष गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या सदस्या कांचन चौधरी,जयमाला मेश्राम,दिनेश चौधरी,अश्विनी जनबंधू,मित्र परिवार व गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

