Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीसर्वप्रथम २०१८ मध्ये प्रेयसीचा गळा चिरून खून.. - जामिनावर सुटका होताच विवाहबाह्य...

सर्वप्रथम २०१८ मध्ये प्रेयसीचा गळा चिरून खून.. – जामिनावर सुटका होताच विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीचाही गळा आवळून खून.. – कोरची तालुक्यातील नराधम आरोपीचे अनेकींशी प्रेमसंबंध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अतिदुर्गम,आदिवासीबहुल व नक्षग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात मन हेलावणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.एखाद्या चित्रपटाची  कथानक जशी असते तशीच घटना कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किलोमिटर अंतरावर असलेल्या
अंतरगाव येथे उघडकीस आली आहे.फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने तिचा गळा चिरून हत्या केली होती.त्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर त्याला गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०२३ मध्ये जन्म ठेपेची शिक्षा सुनावली होती.प्रदीप बालसिंग हारामी रा.अंतरगाव,ता.कोरची,जि.गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.पाच वर्षे कारागृहात राहिल्यानंतर तो वर्षभरापूर्वी जामिनावर बाहेर आला होता.त्याने पूर्वायुष्यातील गुन्हेकृत्य लपवून चमेली परसराम कोराम वय २० वर्षे रा.मुरपार, ता.दवंडी,जि.बालोद,छत्तीसगड हिच्याशी संसार थाटला.तिला तसेच घरच्यांना प्रेयसीच्या खुनाबद्दल नंतर माहिती झाली.मात्र,चमेलीने त्यास स्वीकारले होते.
त्यानंतर त्याचे एका विवाहितेशी प्रेमप्रकरण सुरू झाले.दिनांक-१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी आरोपी प्रदीपचे आई-वडील व बहीण मोहफूल वेचण्यासाठी शेतात गेले होते तर घरी प्रदीप व चमेली दोघेच होते. चमेलीने पतीच्या मोबाइलमध्ये त्याच्या प्रेयसीचे फोटो पाहिले व याबाबत त्यास विचारणा केली,त्यावरून दोघांत वाद झाला.मात्र,प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा गळा दाबून आरोपी प्रदीपने तिला संपविले व पाणी वाहून नेतांना घसरून पडल्यानंतर सोफ्याचा कोना लागण्याचा बनाव रचला.त्यानंतर झोपडी बनविण्यासाठी लाकडे गोळा करण्याचे निमित्त करून तो घरातून बाहेर पडला.इकडे प्रदीपची बहीण शेतातून घरी परतली तेव्हा चमेली मृतावस्थेत आढळली.तिने प्रदीपला फोन करून माहिती दिल्यावर तो धावत घरी गेला व कोटगुलला एका खासगी दवाखान्यात नेले,त्यानंतर तो तिच्या अंत्यसंस्काराची घाई करू लागला; पण माहेरच्या (चमेलीचे घरचे) मंडळींनी उत्तरीय तपासणीची मागणी केली.शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे समोर आले व हत्येच्या घटनेस वाचा फुटली.प्रकरणात कोटगुल पोलीस स्टेशन येथे कलम १०३ बिएनएसएस २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रदीप बालसिंग हारामी वय ३२ वर्षे यास काल,शनिवार ५ एप्रिलला अटक करून कुरखेडा न्यायालयात हजर करण्यात आले.प्रकरणी कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलीस उपनिरीक्षक दयानंद शिंदे,प्रभारी अधिकारी कृष्णा सोळुंके,पोलीस अंमलदार बाबुराव कवडो हे करीत आहेत.
कुरखेडा तालुक्यातील डिप्राटोला-तळेगाव कच्च्या रस्त्यावर गळा चिरून प्रेयसीची केली होती हत्या👇
 
२ फेब्रुवारी २०१८ रोजी कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सहारे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असतांना त्यांना माहिती मिळाली की,डिप्राटोला ते तळेगाव कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजुला एका युवतीचा मृतदेह आढळून आला.त्यांनी तेथे जावून चौकशी केली असता,सदर युवती ही अंदाजे १८ ते २० वर्षांची असून तिचा गळा हत्याराने अर्धवट चिरलेला होता.सदर हत्येबाबत कुरखेडा पोस्टे स्टेशन येथे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.सदर युवतीजवळ ट्रॅव्हल्सचे तिकीट मिळाले.त्या तिकीटावर मोबाइल क्रमांक टाकण्यात आला होता.त्या मोबाइलचा सीडीआर काढला असता, तो मोबाइल आरोपीच्या मित्राचा होता.आरोपीच्या मित्राला विचारपूस केली असता,तो क्रमांक माझाच असून तो मी माझा मित्र आरोपी प्रदीप बालसिंग हारामी रा.ढोलडोंगरी हल्ली मुक्काम अंतरगाव ता. कोरची,याला दिल्याचे त्याने सांगितले.यावरून आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता,त्याने गुन्ह्याची कबुली दिली.चौकशीत आरोपीने सांगितले की,मृतक आरोपीची प्रेयसी होती.ती पुणे येथे नोकरी करीत होती.ती तिच्या गावाजवळील कोटगूल येथील मंडईकरिता पुणे येथून येत असतांना आरोपीने ३१ जानेवारी २०१८ रोजी ५.३० वाजता दरम्यान देसाईगंज येथून तिला सोबत घेतले.डिप्राटोला व तळेगाव या कच्च्या रस्त्याच्या बाजुला नेले. त्याठिकाणी आरोपीने मृतकासोबत शारिरीक संबंध केले.याठिकाणी तिने त्याच्याजवळ लग्नाचा हट्ट धरला.मात्र आरोपीचे यापूर्वीच कॉलेजमधील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याने व मृतक ही लग्नासाठी तगादा लावत असल्याने त्याने तिचा गळा दाबला. ती मृत झाली किंवा नाही,यासाठी त्याने पुन्हा तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जिवानीशी ठार केले. याप्रकरणी आरोपीला ३ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशन कलम ३०२,३७६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावेळी अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु.एम.मुधोळकर यांनी आरोपी प्रदीप हारामी यास कलम ३०२ भांदविमध्ये जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!