Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीसरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना अभिवादन..

सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना अभिवादन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज,शुक्रवार ३१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.देशाची एकता,अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणारे विघटनकारी शक्तींचे आव्हान परतवून लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शपथ सर्वांनी घेतली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कृतीमुळे देशाचे झालेले ऐक्य,अखंडत्व आणि सुरक्षा कायम राखण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली👇
 दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले, सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी,वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!