Sunday, October 25, 2026
Homeदेसाईगंजशेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी मोफत करून द्यावी - नरेश वासनिक यांची मागणी

शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी मोफत करून द्यावी – नरेश वासनिक यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- भारतहा कृषिप्रधान देश आहे.देशातील ७५% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी बांधवांना देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते.अशातच बरेच शेतकरी भाऊ हिष्याच्या कलहामुळे वा इतर घरगुती वादांमुळे बहुतांश शेतकरी शेतजमीनी पडीत ठेवतांना दिसून येत आहेत.मुख्यत्वे शेतकरी बांधवांना नेहमी आर्थिक अडचणींना सामोरेही जावे लागत आहे.यासाठी शासन स्तरावरून शेतकऱ्यांकरीता ठोस पावले उचलून शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोफत करून द्यावी; अशी मागणी  समाजवादी पार्टीचे देसाईगंज शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्हा पाठोपाठ चंद्रपूर,भंडारा,गोंदिया अशी तीन जिल्हे लागून आहेत.चारही जिल्ह्यातील शेतकरी बांधव ८०% ते ९०% शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.सदर जिल्हे धान उत्पादनास प्रख्यात मानली जातात.शेतकरी बांधवांचा विकास व्हावा; या उद्देशाने शासन स्तरावरून अनेक योजना राबविल्या जातात.मात्र राबविण्यात येणाऱ्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येतात.शेतकरी वर्ग सततची नापिकी,दुष्काळ,किडीचा प्रादुर्भाव व इतर अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कर्जबाजारी होऊन टोकाचे पाऊल घेत असतात.यासाठी शासन स्तरावरून ज्याप्रमाणे शेतकरी बांधव यांच्या करीता अनेक योजना राबविल्या जातात; तश्याच प्रकारची योजना अनुसुचित जाती,जमाती व खुल्या प्रवर्गा करीता महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनिंची मोफत मोजणी करून देण्याची योजना राबविण्यात यावी; असे देसाईगंज समाजवादी पार्टीचे  शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!