Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरविहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू..

विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बकऱ्या धुण्यासाठी घराच्या मागे असलेल्या विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल,गुरुवारी ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी माल येथे घडली.गणपत मार्कडी लेनगुरे वय ७० वर्षे असे मृताचे नाव आहे.ऐन दिवाळीच्या सणातच शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी गणपत लेनगुरे हे आपल्या बकऱ्या धुण्यासाठी घरामागील विहिरीतून पाणी काढत होते.  विहिरीला कठडे नसल्याने पाणी काढतांना अचानक तोल गेल्याने ते विहिरीत कोसळले.माहिती मिळताच लोकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र,यश आले नाही.खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.मृताच्या पश्चात पत्नी,मुलगा व मोठा अप्त परिवार आहे.घटनेचा पुढील तपास उमरी पोतदारचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनात नरेंद्र खोब्रागडे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!