Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीलोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे- जिल्हाधिकारी - मतदान केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी;...

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे- जिल्हाधिकारी – मतदान केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत आज,मंगळवार २ डिसेंबरला जिल्हाभरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.आज सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाची गती,सुविधा व व्यवस्थापनाची माहिती घेतांना त्यांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून मतदान हा लोकशाही उत्सव अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा,कारमेल हायस्कूल,पी.एम.श्री पंडीत जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा तसेच लांजेडा नगरपरिषद शाळा या मतदान केंद्रांना भेट दिली.प्रत्येक केंद्रावर मतदार यादी,मतदानाची टक्केवारी,ईव्हीएम मशीनची स्थिती,रांग व्यवस्थापन आणि मतदारांसाठी उपलब्ध सुविधा याची सविस्तर माहिती घेतली.
मतदानासाठी आलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये,यासाठी मूलभूत सुविधा,पिण्याचे पाणी,सावली, प्रवेशमार्ग नियमानुसार उपलब्ध आहेत की नाहीत,याची त्यांनी विशेष तपासणी केली. दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मतदानात प्राधान्य देण्याच्या सूचनादेखील त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिल्या.यावेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!